Contact Us
For Any Query!दि म्युनिसिपल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई
म्युनिसिपल बँक भवन, २४५, पी डि' मेलो रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१
बँकेचे सभासद/ खातेदार यांच्याकरीता सूचना
बँकेचे सभासद/खातेदार यांना कळविण्यात येते कि, सध्या कार्यरत असलेली बँकेची मरीनलाईन्स शाखा स्थित (सोमण बिल्डिंग, डॉक्टर भालेराव मार्ग , जे. एस. रोड , गिरगांव ,मुंबई -४००००४) इमारत म्हाडा मार्फत धोकादायक ( सी - १ ) श्रेणीत वर्ग केली असून, तात्काळ रिकामी करणे आवश्यक असल्याने सदर शाखा दिनांक ०४/०८/२०२५ पासून तात्पुरत्या स्वरूपात बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेत (म्युनिसिपल बँक भवन, २४५, पी डी मेलो रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१) ) येथे स्थलांतरीत करण्यात येत आहे.
बँकेच्या सर्व शाखा कोअर बँकिंग अंतर्गत कार्यरत असल्याने, सभासद/खातेदार बँकेच्या कोणत्याही शाखेतून व्यवहार करू शकतात. मात्र कर्ज सुविधेकरिता मरीनलाईन्स शाखेच्या सभासदांना बँकेच्या मुख्य कार्यालय शाखेस भेट देणे आवश्यक राहील याची नोंद घ्यावी.
बँक विविध डिजिटल प्लॅटफॉर्मअंतर्गत Rupay ATM, MOBILE BANK APP, IMPS, UPI इत्यादीद्वारे सेवा पुरवित आहे.
बँकेच्या सभासद/खातेदारांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.
महाव्यवस्थापक